Latest

अर्भक तस्करीचा ‘सीबीआय’कडून पर्दाफाश, दिल्‍ली, हरियाणात छापे

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) देशातील अर्भक तस्करांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दिल्ली आणि हरियाणामध्ये सात ठिकाणी छापे टाकण्‍यात आल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.

सीबीआयने कारवाईदरम्यान अवघ्या दीड दिवस आणि १५ दिवसांच्या दोन अर्भकांची आणि एका महिन्याच्या एका महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणातील छापे मारीमध्‍ये ५.५ लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने 7 आरोपींनाही अटक केली.

सीबीआय छाप्यादरम्यान केशवपुरम येथील एका ठिकाणी ही दोन्ही अर्भकं सापडली. अर्भकांची विक्री करणारी एक महिला आणि त्यांना विकत घेणाऱ्या पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती सीबीआयच्‍या अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT