पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार, दि. २५ फेब्रुवारी राेजी गुजरातच्या व्दारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. तेथे पूजा केली. आपल्या गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांनी हजारो करोड रूपयांच्या विकास परियोजनांची आधारशिला ठेवली. विविध परियोजनांचे उद्धाटन करून ते राष्ट्राला समर्पित केले. व्दारकेत पंतप्रधान खोल समुद्राच्या पाण्यात गेले आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली ज्या ठिकाणी जलमग्न व्दारका नगरी आहे. पंतप्रधानांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले. पाहता पाहताच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक इंटरनेटवर व्दारका नगरी विषयी सर्च करू लागले आहे.
धार्मिक असाे की पर्यटन स्थळ पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ज्या स्थळांना भेट दिली ते बहुचर्चित झाले आहे. या आधीही पंतप्रधान मोदी देशातील कोणत्याही जागी गेले आणि फोटो शेअर केले, तेंव्हा लोकांनी त्या विषयी इंटरनेटवर सर्चच केले नाही तर लोकांनी त्या ठिकाणी जाण्यास सुरूवात केली. अशाच पाच जागेंविषयी जाणून घेवूयात, ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी पाउल ठेवले आणि ती जागा प्रसिद्ध झाली आणि त्या ठिकाणी पर्यटकांची येण्या जाण्यात मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली.
पंतप्रधानांनी रविवारी गुजरातमधील द्वारका येथे समुद्रात खोलवर जाऊन द्वारका हे जलमग्न शहर असलेल्या ठिकाणी प्रार्थना केली. ते म्हणाले की, मी समुद्राच्या आत गेलो आणि द्वारका हे प्राचीन शहर पाहिले, जे मी अनुभवले ते नेहमीच माझ्यासोबत राहील. पंतप्रधान म्हणाले की, या अनुभवाने मला भारताच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांशी एक दुर्मिळ आणि खोल संबंध दिला.
द्वारका या पाण्याखालील शहराला पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराचे पिस सोबत समुद्रात नेले होते. पीएम मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'बुडालेल्या द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक अतिशय दैवी अनुभव होता. मला अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडल्याचा अनुभव मिळाला. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत.
पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ समोर येताच तो व्हायरल झाला. पंतप्रधानांच्या फेसबुक पेजवर आतापर्यंत सुमारे 38 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 44 हजारांहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर 3 कोटी 80 हून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. द्वारका शहराबद्दल लोक इंटरनेटवर सतत शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे, हे निश्चित.
केदारनाथ गुहा
लोकसभा निवडणुकीच्या 2019 च्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथच्या गुहेत ध्यान केले होते. यानंतर ही गुहा जगभरात चर्चेत आली. पंतप्रधानांचे ध्यान करतानाचे फोटो इतके व्हायरल झाले की लवकरच ही गुहा खास पर्यटन स्थळ बनली. 18 मे 2019 रोजी पीएम मोदी येथे गेले आणि त्यानंतर या गुहेची प्रसिद्धी इतकी झाली की मे महिन्यातच ऑक्टोबर 2019 पर्यंतचे सर्व बुकिंग झाले. त्यानंतर वर्षानुवर्षे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी केदारनाथ मंदिरात गेल्यानंतर गुहेत ध्यान करण्यासाठी गेले होते. पंतप्रधानांनी या गुहेत संपूर्ण रात्र काढली होती. गढवाल मंडल विकास निगम (GMVN) च्या मते, आता येथे रात्रीच्या मुक्कामाचा खर्च 3700 रुपये आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा येथे गेले होते तेव्हा रात्रीच्या मुक्कामाची फी 1500 रुपये होती आणि दिवसभराची फी 990 रुपये होती.
समुद्रसपाटीपासून 12 हजार फूट उंचीवर असलेल्या या गुहेत वाय-फाय, फोन आणि बेडचीही व्यवस्था आहे. यामुळेच पंतप्रधानांनी येथे भेट दिल्यानंतर ही गुहा खूप चर्चेत आली. गुहेत ध्यान करत असलेल्या पंतप्रधानांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर तेथील पर्यटनाची जोरदार चर्चा सुरू असून राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वजण तिथे जाऊन त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोशल मीडिया हँडलवर लक्षद्वीपचे पर्यटन हॉटस्पॉट म्हणून वर्णन केले आहे. त्यानंतर बेटांसाठी फ्लाइट बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
लक्षद्वीप दौऱ्यावर पंतप्रधानांनी स्नॉर्कलिंग आणि मॉर्निंग वॉकही केला. ते म्हणाले की ज्यांना त्यांचे आंतरिक साहस स्वीकारायचे आहे त्यांच्यासाठी लक्षद्वीप तुमच्या यादीत असले पाहिजे. पंतप्रधान म्हणाले की, माझ्या वास्तव्यात मी स्नॉर्कलिंगही केले. हा खूप आनंददायी अनुभव होता. लक्षद्वीपमधील मॉर्निंग वॉकचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, येथील प्राचीन समुद्रकिनाऱ्यांवरील मॉर्निंग वॉक हे देखील अद्भुत क्षण होते.
गतवर्षी लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे २५ हजार होती, ती यावेळी अनेक पटीने वाढू शकते. आगट्टी येथे हवाई पट्टी आहे. कोचीहून येथे जाता येते. आगट्टी ते कावरत्ती आणि कदमात बोटी उपलब्ध आहेत. आगट्टी ते कावरत्ती हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. इतकंच नाही तर कोची ते अगट्टी हे विमान सुमारे दीड तासाचं आहे. कोचीहून जहाजाने 14 ते 18 तासांत लक्षद्वीप गाठता येते. येथे बेटाला भेट देण्याचा वेळ आणि खर्चाचा अंदाज लावता येतो.
गंगटोक, जिथे पंतप्रधानांच्या मुक्कामाचा फोटो व्हायरल झाला होता. सिक्कीमची राजधानी गंगटोक, भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे आणि प्रसिद्ध कांचनजंगा पर्वताची सुंदर दृश्ये येथे दिसतात. 24 सप्टेंबर 2018 रोजी पीएम मोदींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता जो गंगटोकचा होता. यामध्ये पीएम मोदी या सुंदर शहरात सकाळच्या चहाचा आनंद घेताना आणि वर्तमानपत्र वाचताना दिसत होते.
ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला अधिकृत भेट दिली, जिथे त्यांनी प्रार्थना करण्यासाठी पार्वती कुंड आणि जागेश्वर धामला भेट दिली. पार्वती कुंड आणि जागेश्वरची सुंदर छायाचित्रे शेअर करताना, पीएम मोदींनी आदि कैलासच्या सुंदर छायाचिंत्रांवर प्रकाश टाकला.
हेही वाचा :