Latest

स्त्रियांच्या पाळीतील तक्रारी, ‘हे’ आहेत उपाय

Arun Patil

किशोरवयीन मुलींपासून ते मध्यमवयीन स्त्रियांपर्यंत म्हणजेच मासिक धर्म चालू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीच्या कालावधीत स्त्रियांना पाळीच्या बर्‍याच तक्रारी असतात. PCOD म्हणजेच अबनॉर्मल गाठ स्त्रियांच्या अंडाशयाला तयार होते. त्यामुळे अनियमित पाळी व कधीकधी 5-6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त पाळी लांबते. वजन वाढते, हनुवटी, गालावर व ओठांच्या वरील बाजूस नको असलेले केस येणे, पाळीमध्ये ओटीपोटीत खूप दुखणे, असह्य वेदना होणे, पुरुषी हार्मोन अ‍ॅन्ड्रोजनचे प्रमाण वाढलेले असते.

PCOD चे प्रमुख कारण म्हणजे हार्मोनल डमबॅलन्स होणे. स्ट्रेस, टेन्शन, काळजी-चिंता, अनियमित खाण्यांच्या सवयी, कधी कधी आनुवंशिकता ही महत्त्वाची कारणे असतात. आजूबाजूच्या वातावरणाचाही शरीर-मनावर इफेक्ट होत असतो.

PCOD ची लक्षणे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. काहींना तर PCOD ची लक्षणेच जाणवत नाहीत, तर काहींची Oily Skin, पिंपल्स सारखे सारखे येत राहतात. अनियमित पाळी किंवा पाळी अजिबातच येत नाही. कित्येक महिनोन्महिने, नको तिथे नको असलेले केस येत राहणे (पुरुषी हार्मोन वाढल्याने), वजन वाढणे, काही महिलांमध्ये अबॉर्शन होणे किंवा मूल अजिबातच न राहणे. कारण अनियमित बीजनिर्मिती असते, वेलव्हेट प्रकारचे पॅचेस् स्कीनवर येत राहतात. PCOD च्या महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जरा जास्तच असण्याची शक्यता असते. कारण, हार्मोनल डमबॅलन्स असतो. कधी तर डॅन्ड्रफ होते, बी. पी. वाढणे हीसुद्धा लक्षणे दिसतात. PCOD हे डायग्नोसीस करण्यासाठी सोनोग्राफी व ब्लड टेस्ट उपयोगी पडतात.

Androgen चे रक्तातील प्रमाण वाढणे व वरील लक्षणांची जाणीव झाली तर PCOD हे कन्फर्म असे समजावे. शिवाय USG मध्ये अंडाशयाला एक किंवा अनेक गाठी दिसणे, असणे हेही PCOD चे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरते.

होमिओपॅथिक उपाययोजनेबरोबरच खाण्या-पिण्यातून समतोल व सकस आहार, भरपूर पालेभाज्या व फळे, प्रोटीन व कॅल्शियमचे योग्य शरीरातील प्रमाण राहणे फार महत्त्वाचे आहे.

होमिओपॅथिक औषधोपचार ही पूर्ण उपचार पद्धती आहे. कसलेही इंन्जेक्शन/ऑपरेशन न करता, नैसर्गिक पद्धतींनी आपल्या शरीरातील दोष कमी होऊन रुग्णाला पूर्णपणे PCOD पासून मुक्त करता येते. म्हणूनच होमिओपॅथिक औषधे ही शास्त्रशुद्ध पद्धतींनीच व सर्व प्रिन्सिपल्स् व त्या त्या Personality नुसार कॉन्स्टिट्युशनल औषध कमीत कमी मात्रेत जर दिले गेले तर ते मन व शरीर सक्षम बनविण्यास व प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयोग होतो व पेशंट रोगमुक्त PCODमुक्त होऊन त्यांच्या पाळींच्या तक्रारी नाहीशा होतात व ज्यांना मूल राहत नाही त्यांनाही मूल राहण्यास फायदा होतो.

– डॉ. सौ. सपना गांधी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT