Latest

CAR-T therapy रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी सीएआर-टी थेरपी ठरणार निर्णायक

Arun Patil

नवी दिल्ली : रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी भारताच्या अत्याधुनिक उपचार पद्धतीला मंजुरी मिळाली असल्याने लिम्फोसायटिक ल्युकेमिया व बी-सेल लिम्फोमासारख्या गंंभीर कर्करोगांवर यापुढे उपचार करणे शक्य होणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) विशेष कार्य समितीच्या शिफारशीवर भारताच्या स्वदेशी काईमेरिक एंटिजन रिसेप्टर सीएआर-टी CAR-T therapy सेल थेरपीला बाजारात आणण्याची परवानगी दिली.

या उपचार पद्धतीत कर्करोग झालेल्या रुग्णांच्या पांढर्‍या पेशींसह टी सेल्स काढले जातात. CAR-T therapy त्यानंतर ते प्रयोगशाळेत आणून पांढर्‍या रक्ताच्या पेशी त्यातून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर टी सेल्सचे संशोधन करून त्यांना पुन्हा रुग्णाच्या शरीरात घातले जाते. ही प्रक्रिया फक्त एकदा केली जाते. रुग्णाच्या शरीरात गेल्यानंतर टी सेल्स कर्करोगाविरुद्ध लढतात आणि त्यांना आतूनच संपवण्यास सुरुवात करतात. ल्युकेमिया व लिम्फोमासाठी या उपचार पद्धतीला मंजुरी देण्यात आली आहे.

यापूर्वी 2017 मध्ये अमेरिकेत या थेरपीला मंजुरी देण्यात आली होती. तेथे एका रुग्णाला जवळपास 3 ते 4 कोटी रुपये खर्च करावे लागतात; CAR-T therapy पण 2018 पासून भारतीय संशोधकांनी यावर संशोधन सुरू केले. सध्या पुढील काही दिवसांत 30 ते 40 लाख रुपये खर्चात या उपचार पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकेल, असे संकेत आहेत.

सध्या देशात प्रत्येक वर्षी जवळपास 14 लाख लोकांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न होत आले आहे आणि प्रत्येक वेळी याचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्या कर्करोगावर उपचारासाठी रेडिओथेरपी, केमोथेरपी व शस्त्रक्रियेचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, जगभरातील अनेक देशात कार टी सेल CAR-T therapy थेरपीवर देखील अधिक संशोधन व्यापक स्तरावर सुरू आहे. यालाच इम्युनोथेरपी असेही म्हणतात. शरीरात कर्करोगाविरुद्ध लढणार्‍या प्रणालीला विकसित करत रुग्णाला या गंभीर आजारापासून वाचवणे असा याचा उद्देश आहे.

SCROLL FOR NEXT