Latest

Aishwarya in Cannes : उगाचं ऐश्वर्याला सर्वात सुंदर स्त्री म्हणत नाहीत!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

जगतसुंदरी ऐश्वर्या रायला (Aishwarya in Cannes) कान्समध्ये जाणे काही नवीन नाही. पण, कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणे हे नवीनचं म्हणावं लागेल. कारण, रेड कार्पेटवर ही सौंदर्यवती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. आतादेखील ॲश आपल्या नव्या आऊटपिटमुळे चर्चेत आलीय. कानिस चित्रपट महोत्सव २०२२ च्या रेड कार्पेटवर ॲश ही असा काही ड्रेस घालून उतरली की, सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. (Aishwarya in Cannes )

आता तिने न्यू लूकमध्ये स्व:ला सादर केले आहे. आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी ही अदाकारा मात्र नाविन्यपूर्ण आऊटफिटमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला फोटो

बॉलीवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन ७९ वर्षांचे झाले असले तरी ते आपला आनंद कुणाशीही शेअर करायला विसरत नाहीत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून फॅन्सनी खूप सारे कमेंट्स केले आहेत. या फोटोमध्ये मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या दिसत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील हा खास फोटो असून सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टावर हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, अभिषेक बच्चनचा एक कमेंटदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिषेकने कमेंटमध्ये लिहिलं आहे- प्रोग्रेस रिपोर्ट.

यासोबतच चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊसही पाहायला मिळतो आङे. एका चाहत्याने लिहिलं- क्या बात है सुपरस्टार फॅमिली. तर दुसऱ्या चाहत्यानं कमेंट करताना लिहिलं- मनाला स्पर्शून गेलं.

ऐश्वर्या राय आणि ऐश्वर्याचा पोशाख हा कान्स चित्रपट महोत्सवामधील अनेक वर्षांपासून कान्सचा ग आहे. तिचे पोशाख आणि तिची ग्लॅमरस शैली चाहत्यांची मने जिंकतात. यावेळीही ऐश्वर्याच्या स्टाईलने तीन दिवस इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT