Latest

Aadhaar card linkages voter ID : आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंक मोहिम आजपासून, जाणून घ्‍या संपूर्ण प्रक्रिया…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंकची मोहिम सुरु करणार आहे. महाराष्‍ट्रासह काही राज्‍यांनी आजपासून हा उपक्रम सुरु करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक करण्‍यासाठी ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. ( Aadhaar card linkages voter ID )

Aadhaar card linkages voter ID : काय आहे या मोहिमेचा हेतू ?

मतदार यादीमध्‍ये दोनवेळा नावे असणे, पत्ता अपूर्ण असणे आदी चुका आढळून येत होत्‍या. मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केल्‍यामुळे एकाच व्‍यक्‍तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात किंवा त्‍याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासणी अधिक सोपी होणार आहे. तसेच मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत असणारी माहितीची तपासणेही अधिक सोपे होणार आहे.

डिसेंबर २०२१मध्‍ये लोकसभेत विधेयक मंजूर

मतदान ओळखपत्रांशी आधार लिंकसाठी निवडणूक कायदे सुधारणा विधेयक लोकसभेमध्‍ये डिसेंबर २०२१ मध्‍ये आवाजी मतदानाद्वारे मंजूर झाले होते. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. मात्र न्‍यायालयाने याप्रकरणी सक्षम उच्‍च न्‍यायालयात दाद मागा असे स्‍पष्‍ट केले होते.

महाराष्‍ट्रात आजपासून सुरु होणार प्रक्रिया

महाराष्‍ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी
त्‍यांनी सांगितले होते की, "आधार आणि मतदान ओळखपत्र लिंकिंगची प्रक्रिया १ ऑगस्‍टपासून राज्‍यात हाती घेण्‍यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांची ओळख पटवणे सोपे जाईल. एकाच व्‍यक्‍तीच्‍या एकापेक्षा जास्‍त मतदारसंघात किंवा एकदाच मतदारसंघात एकापेक्षा जास्‍त वेळा मतदार यादीत नोंदणी झाली आहे का हेही तपासता येईल." १७ वर्षांपेक्षा अधिक वयाचे युवकही मतदानाचा हक्‍क मिळविण्‍यासाठी पात्र वय होईपर्यंत प्रतीक्षा न करता नावनोंदणीसाठी आता अर्ज करु शकणार आहेत, असेही देशपांडे यांनी स्‍पष्‍ट केले होते.

अशी असेल आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंक करण्‍याची प्रक्रिया

राज्‍य निवडणूक आयोग यासाठी शिबिर घेणार आहेत. यामुळे आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्‍याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच तुम्‍ही घरबसल्‍याही ही ऑनलाईन प्रक्रिया करु शकता, यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे…

  • सर्वप्रथम नॅशनल व्‍होटर सर्विस पोर्टल ( एनव्‍हीएसपी) वेबसाईटला ( https://www.nvsp.in ) भेट द्‍या. येथे लॉग इन करा. तुमची नोंदणी नसेल तर नवीन यूजर म्‍हणून नाव नोंद करा.
  • nvsp वेबसाईटच्‍या होम पेजवरील search in Electotal वर क्‍लिक करा. येथे मतदान ओळखपत्र, ईपीआयसी नंतर आणि
    स्‍टेट टाकून सर्च करा.
  • यानंतर Feed Aadhaar No या पर्यायावर क्‍लिक करा.
  • येथे ओपन होणार्‍या विंडोवर तुम्‍हाला तुमच्‍या आधार कार्डसंदर्भातील माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्‍ही ओळख तपासणीसाठी तुमच्‍या नोंदणी असणार्‍या मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर एक ओटीपी येईल.
  • हा ओटीपी देवून तुम्‍ही सबमिटवर क्‍लिक करा. यानंतर तुम्‍हाला नोटिफिकेशनच्‍या माध्‍यमातून आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्‍याची माहिती मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT