Latest

लोणी काळभोर : पीएम किसान योजना लाभार्थी पडताळणीसाठी हवेलीमध्ये शिबीर

अमृता चौगुले

लोणी काळभोर; पुढारी वृत्तसेवा: हवेली तहसील कार्यालयाचे वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी (ई केवायसी ) करण्यासाठी 29 ,30 ,31 ऑगस्ट रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील 80 गावांमध्ये तलाठी कार्यालय ,ग्रामपंचायत कार्यालय, संग्राम ,केंद्र महा-ई-सेवा केंद्र, चावडी या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महसूल, कृषी ,पंचायत समिती या विभागाकडील अनुक्रमे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यामध्ये वाटून दिलेल्या गावांमध्ये हे कर्मचारी ही कामे करतील या तहसीलदारकार्यालयाकडून गावातील पडताळणी (ई केवायसी ) न केलेल्या लाभार्थ्यांची यादी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी सोसायटी बोर्ड, पतसंस्था, बँक, चावडी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी आपली पडताळणी ही (केवायसी) करून प्रशासनास सहकार्य करावे. लाभार्थ्यांनी पडताळणी ( ई केवायसी) न केल्यास 1 सप्टेंबर 2022 नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. संग्राम, केंद्र महा-ई-सेवा केंद्र येथे तसेच लाभार्थी पी एम किसान मोबाईल एप्लीकेशन यावरून व exlink.pmkisan.gov.in वरही घरच्या घरी सदर पडताळणी ही ( ई केवायसी )स्वतः करू शकतात.

पडताळणी (ई केवायसी) करण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्ड ची लिंक मोबाईल नंबर लाभार्थी यांनी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. याचबरोबर या विशेष मोहिमेत मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे व पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल ॲप मध्ये पीक पाहणी करणे याचाही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी हवेली तहसीलदार हवेली यांचे कडून सर्व नागरिकांना सदर उपक्रमांतर्गत देण्यात योजनांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT