Latest

Cambodian PM Hun Sen : G20 शिखर परिषदेसाठी आलेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन कोरोना पाॅझिटिव्ह

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी, जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन हे देखील कोरोना संक्रमित झाले आहेत. G20 शिखर परिषदेसाठी इंडोनेशियात आलेल्या हुन सेन कोरोना संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी सेन हे इंडोनेशियातील बाली येथे पोहोचले होते. तत्पूर्वी, कंबोडियातील नोम पेन्ह येथे झालेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली होती.

कंबोडियाच्या एका नेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोमवारी रात्री सेन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर येथील एका इंडोनेशियन डॉक्टरने देखील त्यांना कोविड -19 ची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. यावर सेन यांनी ते कंबोडियाला परतत असल्याचे स्पष्ट केले आहे.  त्यामुळे G20 शिखर परिषद आणि त्यानंतर बँकॉकमध्ये आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) गटाच्या बैठकीत ते सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT