Latest

क्रिकेटपटू मोहम्‍मद शमीला उच्‍च न्‍यायालयाचा दिलासा, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी अटक वॉरंटवरील स्‍थगिती कायम

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने दिलासा दिला आहे. कौटुंबिक हिसाचार प्रकरणी शमीच्‍या अटक वॉरंटवरील स्‍थगिती रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. शमी यांच्‍या पत्‍नीने २०१८ मध्‍ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. शमीने आपल्‍यावर प्राणघातक हल्‍ला केल्‍याचा आरोपही तिने केला होता. ( Domestic Violence Case )

सत्र न्‍यायालयाच्‍या निर्णयात हस्‍तक्षेपास उच्‍च न्‍यायालयाचा नकार

शमीच्‍या अटकेला सत्र न्‍यायालयाने स्‍थगिती दिली होती. तसेच या निर्णयावरील फेरविचाराची सुनावणी होणार आहे. त्‍यामुळे या प्रकरणी सत्र न्‍यायालयाच्‍या आदेश उच्‍च न्‍यायालयाने हस्‍तक्षेप करण्‍याची आवश्‍यकता नाही, असे कोलकाता उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती शम्‍पा दत्त यांच्‍या एक सदस्‍यीय खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

Domestic Violence Case : शमीविरोधात पत्‍नीने केली होती तक्रार

मोहम्‍मद शमीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. याला विरोध केल्‍याने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी शमीने आपल्‍यावर प्राणघातक हल्‍ला केल्‍याची तक्रार पत्‍नीने दाखल केली होती. या प्रकरणी मार्च २०१८ रोजी जाधवपूर पोलिस ठाण्‍यात कौटुंबिक हिंसाचारा गुन्‍हा शमी व त्‍याच्‍या नातेवाईकांविरोधात गुन्‍हा दाखल झाला होता.

या प्रकरणी मोहम्‍मद शमी आणि त्‍याच्‍या नातेवाईकांविरोधात न्‍यायालयाने २९ ऑगस्‍ट २०१९ रोजी अटक वॉरंट जारी केले होते. शमीने अटक वॉरंटला स्‍थगिती मिळण्‍यासाठी अलिपूर सत्र न्‍यायालयात धाव घेतली होती. ९ सप्‍टेंबर २०१९ रोजी अलीपूर सत्र न्‍यायालयाने शमीच्‍या अटकेला स्‍थगिती दिली होती. शमीच्‍या पत्‍नीने या आदेशाविरोधात कोलकाता उच्‍च न्‍यायलयात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT