Latest

Cabinet Decision: अवकाळीग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करा ; मुख्यमत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : सततचा पाऊस हा 'नैसर्गिक आपत्ती' म्हणून जाहीर झाली असून, यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. आज (दि.१६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
  • अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता
  • इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
  • मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT