Latest

Bus Accident in MP: मध्य प्रदेश बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा २३ वर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.९) सकाळी ८.३० च्या बोराड नदीच्या पुलावरुन बस काेसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २३ वर पोहचली आहे. २५ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती दूर ग्रामीण परिक्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक राकेश गुप्ता (Bus Accident in MP) यांनी  दिल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील (Bus Accident in MP) जखमींवर खरगोन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ११ जणांना पुढील उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आले आहे. या बसच्या चालकाचा जबाब नोंदवला जात आहे, मात्र तो पोलिसांना व्यवस्थित माहिती देत नसल्याचे समोर आले आहे.

खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फूट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक MP 10 P 7755 ही बस ओव्हरलोड होती, त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये साधारण ४० प्रवाशी असल्याचे माहिती आहे. यामधील २३ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT