Latest

अर्थसंकल्पातून सर्व सामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न असणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने देशाच्या 2023-24 वर्षासाठीच्या संसदेच्या संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. देशासाठी हा निश्चितच मोठा गौरवपूर्ण क्षण आहे. हा देशासाठी नारीशक्तीचा मोठा सन्मान असणार आहे. येणा-या अर्थसंकल्पातून सर्व सामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक अर्थसंकप्लाबाबत संकेत दिले आहे.

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. उद्या देशाचे 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सरकारकडून सादर केला जाईल. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "देशाच्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री या दोन्ही ही महिला आहेत आणि हा भारतासाठी महत्वाचा आणि गौरवाचा क्षण आहे," असे म्हणत त्यांनी यासाठी अभिमान व्यक्त केला.

यावेळी भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून भारतातील सर्वसामान्य जनेतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून देश आणि देशवासी हेच प्रथम प्राधान्यक्रम असेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT