पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रही मागे नाही. (Budget2023) पर्यटन क्षेत्रातही नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी आहेत. राज्यांच्या सरकारी कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी यांच्या सक्रिय सहभागाने मिशन मोडवर पर्यटनाला चालना दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणेत केली. (Budget2023)