Latest

पुणे हादरलं ! प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या; भाजी चिरण्याच्या चाकूने सपासप वार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेलेल्यानंतर तेथे झालेल्या वादातून दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीतच राग अनावर झाल्याने तरूणीने प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून खुन केल्याचा धक्कादायक प्रकार लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या घटनेत तिलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आकांक्षा पन्हाळे (21 ,रा. अहमदनगर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर यशवंत मुंडे (22 , रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत मुंडे आणि आकांक्षा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये डाटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या महाविद्यालयाची परीक्षा असल्याने ते दोघे एकत्रित अभ्यास करत होते. रविवारी रात्री आकांक्षा पन्हाळे ही तरुणी यशवंत मुंडे याच्या रायसोनी कॉलेज जवळ येईल खोलीवर अभ्यास करण्यासाठी आली होती. सोमवारी पहाटे सदर दोघांमध्य काहीतरी कारणावरून वाद झाले.

यशवंत मुंडे यानी तरुणी सोबत भांडण केली. यावेळी आकांक्षा हीने स्वयंपाक घरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू हातात घेत यशवंत याच्यावर चाकूने वार केले. दोघांमध्ये सुरू असलेल्या झटापटीत गंभीर जखमी झालेल्या यशवंत मुंडे याचा मृत्यू झाला आहे. तर आकांक्षा ही सुद्धा जखमी झाली असून तिला उपचार करीता वाघोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच, लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मयत यशवंत मुंडे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

तपास निष्पन्न झाल्यानुसार दोघेही प्रियकर प्रेयसी होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. दोघांचीही परिक्षा सुरू असल्याने तरूणी तरूणाच्या खोलीवर अभ्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातून तिने तरूणाचा चाकूने वार करून खुन केला. तरूणीही यामध्ये जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

– गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT