Latest

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शोधला नवा रक्तगट

Arun Patil

लंडन : ए, बी, एबी आणि ओ गटाशिवाय जगात रक्ताचे अनेक प्रकार आहेत. ब्रिटनमधील 'ब्रिस्टल युनिव्हर्सिटी' आणि 'नॅशनल हेल्थ सर्व्हे ब्लड अँड ट्रान्सप्लांट'च्या शास्त्रज्ञांनी नुकतेच एक अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणार्‍या रक्ताचा गट शोधून काढला आहे. यास 'Er' असे नाव देण्यात आले आहे. या शोधाने गंभीर परिस्थितीत लोकांचा जीव वाचविला जाऊ शकेल.

कोणत्याही रक्तगटाची ओळख त्या रक्तात असलेल्या प्रोटिन्सने होते. हे प्रोटिन्स लाल रक्त कोशिकांच्या (RBCs) वरच्या स्तरावर असतात. ए, बी, एबी आणि ओ हे सर्वसामान्य रक्तगट म्हणून ओळखले जातात. जर रक्तात ठह प्रोटिन असेल तर ते निगेटिव्ह बनते. गरज भासल्यास संबंधिताला त्याच्या रक्त गटाचे दुसरे रक्त दिले जाते. मात्र, दुसर्‍या गटाचे रक्त चढविल्यास शरीर त्याला आपले शत्रू समजते व संबंधिताची इम्यून सिस्टम गंभीर प्रतिक्रिया देऊ लागते.

'ब्लड जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनाने 30 वर्षे जुन्या रहस्यावरचा पडदाही बाजूला सारला. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांजवळ रक्तगटाशी संबंधित दोन केसीस आल्या. दोन गर्भवती महिलांच्या रक्तात जटिलता निर्माण झाल्याने गर्भाशयातच भ्रूणांचा मृत्यू झाला. याची अधिक तपासणी केली असता, त्या महिलांचा रक्तगट 'Er' असल्याचे आढळून आले. जर आईचा रक्तगट 'एी' असेल तर बाळाच्या रक्ताविरुद्ध आईची इम्यून सिस्टम अँटिबॉडीज तयार करते. हे अँटिबॉडिज प्लॅसेंटाच्या माध्यमातून बाळापर्यंत पोहोचते व त्याच्यात हिमोलिटिक आजाराचे कारण बनते. यामध्ये आईचे अँटिबॉडिज न जन्मलेल्या बाळाच्या लाल रक्तकोशिकांवर हल्ला करते आणि ते बाळाचे हार्ट फेल्यूअर अथवा मृत्यूचे कारण बनू शकते.

SCROLL FOR NEXT