Latest

Brijbhushan Singh : बृजभूषण यांनी कुस्तीपटूंशी गैरवर्तन केले होते; कुस्ती पंच जगबीर

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मार्च 2022 मध्ये लखनौमध्ये आशियाई चॅम्पियनशिप ट्रायल्सच्या शेवटी टीम फोटो क्लिक करत असताना बृजभूषण यांनी एका महिला खेळाडूशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाची तत्कालीन कुस्ती पंच जगबीर सिंग यांनी पुष्टी केली आहे. या महिला कुस्तीपटूने अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर अनुचित स्पर्श केल्याचा आरोप केला होता. (Brijbhushan Singh)

2007 पासून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच, बृजभूषण आणि तक्रारदार यांच्यापासून काही फूट दूर उभे असलेले जगबीर सिंग यांनी दिल्ली पोलिसांसमोर दिलेल्या साक्षीत कुस्तीपटूच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना जगबीर सिंग यांनी या फोटोचा संदर्भ देत सांगितले की, दिल्ली पोलिसांनी त्यांना याबद्दल विचारले होते. जगबीर सिंग म्हणाले, मी त्यांना बृजभूषण यांच्या शेजारी उभे असलेले पाहिले. तिने स्वत:ला सोडवले, ढकलले, बडबड केली आणि निघून गेली. ती अध्यक्षांच्या शेजारी उभी होती, पण नंतर समोर आली. ही महिला कुस्तीपटू कशी प्रतिक्रिया देत होती हे मी पाहिले आणि ती अस्वस्थ होती. मी त्याना काही करताना पाहिले नाही पण, पैलवानांना हात लावायचा आणि इकडे ये, इथे उभे राहा म्हणायचे. त्या दिवशी फोटो सेशन करताना काहीतरी गडबड झाल्याचे तक्रारकर्त्याच्या वागण्यावरून स्पष्ट होते. (Brijbhushan Singh)

एफआयआरनुसार महिला कुस्तीपटूने आपल्या तक्रारीत म्हटले की, मी शेवटच्या रांगेत उभी असताना बृजभूषण सिंह माझ्याजवळ येऊन उभा राहिले. मला अचानक पार्श्वभागावर हात जाणवला. मी लगेच मागे वळून पाहिले तो हात बृजभूषण यांचा होता. त्यांच्या अनुचित स्पर्शापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी ताबडतोब त्या ठिकाणाहून लांब जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बळजबरीने माझा खांदा धरला. मी कसेतरी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवले.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT