Latest

Brij Bhushan Singh : बृजभूषण यांच्या अडचणी वाढल्या

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लैंगिक छळ केल्याच्या आरोपाने वेढलेल्या बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात त्यांच्यावर एफआयआर नोंदवल्यानंतर फिर्यादी अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा जबाब पोलिसांनी नोेंदवला आहे. तिने आपल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिस आता अन्य कुस्तीपटूंचेदेखील जबाब नोंदवणार आहेत. एनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Brij Bhushan Singh)

अल्पवयीन महिला कुस्तीपटूने फेडरेशनच्या प्रमुख आणि खासदार यांच्यावरील लैंगिक छळाशी संबंधित आरोपांविषयी आपला जबाब नोंदवला आहे. सीआरपीसीच्या कलम 164 अन्वये कुस्तीपटूचा जबाब नोंदवला. (Brij Bhushan Singh)

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्यावर यापूर्वीच दोन एफआयर दाखल केले होते. दरम्यान, या प्रकरणात खटला चालवला जाणार आहे. पोलिस पीडितांचे जबाब नोंदवून घेणार आहेत. त्यामुळे बृजभूषण यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूंशी लैंगिक छळ केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यात पोक्सो कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसर्‍या एफआयआर लैंगिक छळाच्या आरोपाखाली दाखल केले गेले आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT