Latest

Porn : हॅकर्सनं एअरपोर्टवरील डिस्प्ले स्क्रीन केली हॅक अन् प्रवाशांना दाखवली पॉर्न फिल्म!

दीपक दि. भांदिगरे

रियो दि जानेरो (ब्राझील) : ब्राझीलमधील रियो दि जानेरो येथील एका विमानतळावर प्रवाशांना लाजीरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानतळावरील इलेक्ट्रॉनिक 'डिस्प्ले स्क्रीन' हॅकर्सने हॅक (Brazil airport screens hacked) केली. यामुळे गोंधळ उडाला. या 'डिस्प्ले स्क्रीन'वर प्रवाशांना विमान उड्डाणांबाबात माहिती दिली जाते. पण स्क्रीन हॅक झाल्याने त्यावर अश्लिल चित्रपट (porn movies) दिसू लागले. या प्रकरणी ब्राझील विमानतळ प्राधिकरणाने पोलिसात तक्रार दिली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये सांतोस डुमोंट विमानतळावरील 'डिस्प्ले स्क्रीन'वरील पॉर्न दृश्ये (porn movies) पाहून काही प्रवाशी हसत असल्याचे दिसतात. तसेच काहींनी आपल्या लहान मुलांनी स्क्रिनवरील दृश्ये पाहू नयेत याची काळजी घेतली. तर काही प्रवाशी बिनधास्त पॉर्न फिल्म पाहताना दिसले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याबाबत विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्क्रिनवर दाखवल्या जाणाऱ्या सूचना सेवांची जबाबदारी एका कंपनीवर आहे. पण ही डिस्प्ले स्क्रीन्स हॅक (Brazil airport screens hacked) झाल्याने ती आता बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्राधिकरण अवाक झाले. याची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.