Latest

लोणी काळभोर : स्थानिक बेरोजगारांना हाकलण्यासाठी कंपन्यांनी नेमले बाउन्सर

अमृता चौगुले

सिताराम लांडगे

लोणी काळभोर: स्थानिक तरुणांना खासगी कंपन्यानी रोजगारास प्राधान्य द्यावे असा कायदा असताना त्याउलट स्थानिक बेरोजगारांना कंपनीमध्ये अथवा परिसरात फिरकु न देण्यासाठी मुजोर कंपनी प्रशासनाने अनधिकृतपणे खासगी बाउन्सर नेमून दडपशाही सुरू केली आहे. परंतु स्थानिक पोलीस एवढा गंभीर प्रकार माहीती असुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या मुजोर प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा धाक राहीला नाही. हवेली तालुक्यात या मुजोर कंपन्याचे अधिकारी कायदा पायंदळी तुडवत आहेत.

पुर्व हवेली तालुक्यात सहकार क्षेत्र नामशेष झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांची मुले व तालुक्यातील बेरोजगारांना आपल्या रोजी रोटीचे एकमेव साधन म्हणजे या भागात असलेल्या खासगी कंपन्या. या कंपन्यामध्ये हजारो तरुण नोकरी करत असून याच खासगी कंपन्या रोजीरोटीचे साधन बनल्या आहेत, परंतु अलीकडच्या काळात काही मोठ्या आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्यामधील व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी एक फतवा काढून स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये नोकरी न देण्याचा अलिखित नियम केला आहे.

या कंपन्यामध्ये व्यवस्थेविरुद्ध स्थानिक भुमिपुत्रांना नोकरी देण्यासाठी युनियन लीडरने आवाज ऊठविला तर यांना बेकायदा घरचा रस्ता दाखवत स्थानिकांचा आवाज दाबला आणि कंपनीमध्ये अथवा परीसरात फिरकु नये, बेरोजगारांवर दहशत बसावी म्हणून खासगी बाउन्सर नेमले आहेत.

स्थानिक तरूण नोकरी मागण्यासाठी आले तर, हे बाउन्सर त्यांना धमकवतात, दहशत दाखवतात यामुळे या भागात रोजगार मिळणे अवघड झाले आहे. हे बेकायदा नेमलेले बाउन्सर कंपनीचे अधिकृत कामगार नसून स्थानिक पोलीसांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणात तपासले नाही, तर कंपनी प्रशासन आणि पोलीसांची आर्थिक लागेबांधे असल्यामुळे चौकशी होत नसल्याने स्थानिक भूमिपुत्रावर अन्याय होत आहे.

स्थानिक बेरोजगारांना न्याय देणार : आमदार अशोक पवार
पुर्व हवेलीतील स्थानिक भुमिपुत्रांना व बेरोजगारांना खासगी कंपन्यामध्ये रोजगार दिला जात नाही हे अत्यंत गंभीर प्रकार आहे. या बाबतीत कंपन्याना जाब विचारला जाईल व स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कामगार मंत्री यांना भेटून न्याय दिला जाईल. पुणे शहराच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून दहशत बसविणाऱ्या कंपनी प्रशासन व बाउन्सरवर कारवाई करण्याबाबत मागणी करण्यात येणार असल्याचे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT