पुढारी ऑनलाईन डेस्क
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना आयटी, एनर्जी, बॅटरी, खासगी बँक, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी विविध प्रकारच्या घोषणा केल्याने या क्षेत्रातील शेअर्स 1 टक्क्यांपासून 5 टक्क्यांपर्यंत वधारले.
सध्याची कोरोना परिस्थिती पाहता वर्क फ्रॉम होम, 5जी इंटरनेटआणि इतर बदलत्या तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद होण्याची अपेक्षा असल्याने निफ्टी आयटीचा इंडेक्स एक टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, कॅम्स, एचसीएल टेक यासारखे शेअर्स 2 टक्क्यांपर्यत वधारले होते.
बँकिंग क्षेत्रात कोअर बँकिंग प्रणाली, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम, ऑनलाईन निधी हस्तांतरणबाबत घोषणा झाल्याने एचडीएफसी बँक शेअर 1.57 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.68 टक्के, ॲक्सीस बँक 2.30 टक्के, बंधन बँक 1.30 टक्के, एयू बँक 2.25 टक्क्यांनी वधारले.
पैशांची देवाण-घेवाण वाढावी यासाठी देशातील पोस्ट ऑफीस आणि बँकांना जोडले जाणार आहे. तसेच डिजिटल बँकिंगचा वापर लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अर्थसंकल्पात दळणवळण, बॅटरी आणि एनर्जी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद झाल्याने एक्साईड, अमराराजा, एक्साईड या शेअर्सनीही उसळी घेतली होती.
हेही वाचा