Latest

Stars Happy New Year 2023 : बॉलिवूड स्टार्स नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज (Pics)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी बॉलिवूड स्टार्स टूरवर गेले आहेत. कुणी परदेशात गेले तर काहींनी राजस्थान, मध्यप्रदेश सारखे ठिकाणे निवडली आहेत. (Stars Happy New Year 2023) यामध्ये वरूण धवन-नताशा, विकी कौशल-कॅटरीना कैफ, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. हे स्टार्स आदीच ट्रिपसाठी आपल्या पार्टनरसोबत, फॅमिलीसोबत निघून गेले आहेत. त्यांचे फोटोदेखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळताहेत. (Stars Happy New Year 2023)

करीना कपूर-सैफ अली खान स्वित्झर्लंड

करीना कपूर खान -सैफ अली खान आपल्या मुलांसोबत न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी ट्रिपवर निघाले आहेत. करीना कपूरने इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो पोस्ट केलाय. करीना -सैफ आपल्या दोन्ही मुलांसोबत स्वित्झर्लंड ट्रिपवर आहेत. आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीनाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करीनासोबत सैफ अली खान, मुलगा तैमूर आणि जेहदेखील दिसत आहेत. सर्वांनी ब्लॅक कलरचा आऊटफिट्स घातला आहे.

करीना ब्लॅक जॅकेट आणि सेम कलरच्या पँटमध्ये खूप गॉर्जियस दिसत आहे. सैफ ब्लॅक जॅकेटमध्ये खूप हँडसम दिसत आहेत. जेह आणि तैमूर दोघेही लॉलीपॉप खाताना दिसत आहेत.

करीनाच्या कॅप्शनने केलं कन्फ्यूज

फोटो कॅप्शन देत करीनाने लिहिलं की, 'आता काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 29-12-2022. टिम काय कात आहे? स्ट्रॉबेरी लॉलीपॉप?'

सोनाक्षी पोहोचली फिनलँडला

सोनाक्षी सिन्हाने फिनलँडहून काही फोटोज शेअर केले आहेत. तिने विमासळावरून काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय विमानातून काही फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शन लिहिलीय- @ourfinland was calling out to me, and i made it there in the comfort of @feelfinnair… looking forward to experiencing a snowy new year! #feelfinnair #VisitFinland

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन पॅरिसच्या दौऱ्यावर आहे. त्याने पॅरिसची सोलो ट्रिप केलीय. एका हॉटेलमधून फोटो शेअर करत त्याने लिहिलंय-Shehzada ??. कार्तिकने स्वत:चा एक सेल्फी व्हिडिओ शेअर करत When in Paris अशी कॅप्शन दिलीय. या व्हिडिओत आयफेल टॉवर दिसत आहे. आणखी एक फोटो शेअर करत त्याने Yolo and Solo ?? असं लिहिलं आहे. त्याच्या या फोटो आणि व्हिडिओला खूप सारे कमेंट्स मिळत आहेत.

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी मध्यप्रदेशात गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

विक्की कौशल-कॅट

बॉलीवूडचे फेव्हरेट कपल विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ आपले न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी राजस्थान गेले आहेत.

अनुष्का शर्मा – विराट कोहली 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुबई टूरवर आहेत.

विराट कोहली- अनुष्का शर्मा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT