Latest

Bollywood Films shoot in Ukraine : ‘या’ बिग बजेट बॉलीवूड चित्रपटांचे युक्रेनमध्ये शूटींग

मोनिका क्षीरसागर

पुढारी, ऑनलाईन डेस्क : युक्रेन निसर्ग सौदर्यामुळे, चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांचे शूटींग युक्रेनमध्ये झाले. यामध्ये रजनीकांत, बॉलीवूड अभिनेता सलमान खानपासून, आलिया भट्टपर्यंत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या बॉलीवूड आणि दक्षिणात्य स्टार्सचा समावेश आहे. (Bollywood Films shoot in Ukraine)

युक्रेन आणि रशियामधील संबंध बिघडल्यानंतर, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी युद्धात १३७ लोक मारले गेले. हे युद्ध जरी रशिया-युक्रेन यांच्यातले असले, तरी या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे.

या युद्धामुळे केवळ परस्पर संबंधच बिघडणार नाहीत, तर त्याचा खोलवर परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, शेअर बाजार तसेच चित्रपट उद्योगावरही दिसून येणार असल्याचे जाणकार सांगतात.

Bollywood Films shoot in Ukraine : या बॉलीवूड चित्रपटांचे युक्रेनमध्ये शूटींग

'आरआरआर' (RRR)

आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 'आरआरआर' (RRR) या चित्रपटाचे काही सीन युक्रेेनमध्ये झाले आहेत. एसएस राजमौली (SS Rajmaouli) दिग्दर्शित चित्रपटात अजय देवगन, ज्युनियर एनटीआर याचीही भूमिका आहे. या चित्रपटातील एक पार्टचे युक्रेनमध्ये शूटिंगचा झाले आहे.

टायगर 3 (Tiger 3)

अभिनेता सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर 3 चेही शूटींग यूक्रेनमधील एका शहरात झाले आहे. या शहरातील नयनरम्य लोकेशन पाहिल्यानंतर निर्मात्यांनी शूटिंगसाठी युक्रेनची निवड केली होती.

2.0 movie

सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन यांचा '2.0' या चित्रपटाचे शूटिंगही यूक्रेनमध्येच झाले आहे. या चित्रपटातील 'टनल ऑफ लव्हमध्ये' या गाण्याचे शूट येथे करण्यात आले होते.

विनर (Winner)

नुसते बॉलीवूडचे नाही, तर अनेक तेलगु चित्रपटांचेही शूटिंग युक्रेनमध्ये झाले आहे. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित विनर (Winner) या तेलगु चित्रपटाचे बहुतांशी शूटिंग युक्रेनची राजधानी कीव्ह आणि ल्विव या शहरात झाले आहे. यामध्ये साई धरम तेज आणि रकुल प्रीत सिंह याची मुख्य भूमिका आहे.

बॉलीवूडच्या या प्रसिद्ध गायकाच्या '99' या गाण्याचे शूटही युक्रेनमध्ये

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक एआर रहमान यांनी लिहिलेले आणि निर्माती केलेल्या '99' या गाण्याचे चित्रीकरणही युक्रेनमध्ये झाले आहे. हे गाणे एहान भट आणि एलिस वर्गास यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर या गाण्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेती मनीषा कोईरालाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

99 SONGS – Official Trailer | AR Rahman

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT