Latest

Manipur Violence : ‘लज्जास्पद! भयानक! अधर्म!’ मणिपूर घटना ही विकृतीचा कळस, बी-टाऊन कलाकारांचा संताप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये महिलांसोबत झालेल्या अत्याचारानंतर बॉलिवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची विर्वस्त्र करून धिंड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Manipur Violence ) ही लज्जास्पद घटना पाहून सामान्य नागरिक ते स्टार्सपर्यंत सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. या व्हिडिओनंतर अक्षय कुमार, ऋचा चड्ढा, उर्फी जावेदसह अनेक स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही घटना निंदनीय आहे. दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे. (Manipur Violence )

अक्षय कुमारने ट्विट करून व्यक्त केला संताप

अभिनेता अक्षय कुमारला या घटनेने अस्वस्थ केलं आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करून लिहिलं, 'मणिपूरमध्ये महिलांच्या विरोधात हिंसेचा व्हिडिओ पाहून अस्वस्थ झालोय. अपेक्षा करतो की, दोषींना इतकी कडक शिक्षा मिळाली की, कुणीही पुन्हा असे भयानक कृत्य करु नये.'

उर्फी जावेदचा राग अनावर

उर्फी जावेद नेहमी अनेक छोट्या-मोठ्या मुद्यांवर आपले मत मांडते. तिने लिहिलंय, 'मणिपूरमध्ये जे झालं, ते केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी लज्जास्पद आहे.'

उर्मिला मातोंडकरने सोडलं मौन

उर्मिला मातोंडकरने मणिपूरच्या या घटनेचा कडक विरोध केला आगे. तिने ट्विट करून लिहिलं, 'मणिपूर व्हिडिओ आणि या घटनेने घाबरलेय. मे झालेल्या या घटनेवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. लाज वाटायला पाहिजे, त्या लोकांना जे सत्तेच्या नशेत गुंग उंच घोड्यावर बसले आहेत. डियर भारतीय/इंडियन्स आम्ही येथे कधी पोहोचलो?'

रेणुका शहाणेने उपस्थित केले प्रश्न

रेणुका शहाणेने प्रश्न उपस्थित केला आहे की, मणिपूरमध्ये अत्याचार थांबवणारा कुणीही नाही का? जर तुम्हाला त्या दो महिलांच्या विचलित करणाऱ्या व्हिडिओमुळे अस्वस्थता वाटत नसेल तर, स्वत:ला माणूस म्हणणे योग्य आहे का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT