Latest

पालघर : वैतरणा नदीत बोट बुडाली; २१ कामगार बचावले, २ बेपत्ता

दिनेश चोरगे

पालघर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू असताना जीआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची बोट वैतरणा नदीत उलटून अपघात घडला. पालघर तालुक्यातील नवघर घाटीम गावाजवळील ही घटना घडली आहे.

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या जीआर कंपनीची बोट दुर्घटनाग्रस्त झाली असून, बोटीवरील वीस कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे.

नवघर घाटीम येथे मुंबई-वडोदरा महामार्गाचे काम करणारी व कामगारांना ने-आण करणारी मोठी बोट सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास वैतरणा नदीमध्ये खराब झाल्याने या कामगारांनी एका दुसर्‍या लहान बोटीला बोलावले. सुमारे 23 कामगार या बोटीमध्ये बसले होते. मात्र, बोटीची क्षमता नसल्याने कामगारांनी भरलेल्या बोटीचा तोल गेला व यादरम्यान बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच सर्व कामगारांनी वैतरणा नदीत उड्या मारल्या व ते बचावले. मात्र, या घटनेमध्ये दोन कामगार बेपत्ता झाले. हे सर्व कामगार मुंबई-वडोदरा महामार्गाचे काम करणार्‍या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कामगार होते.

SCROLL FOR NEXT