Latest

Blind Love : प्रेमासाठी काहीही! पाकिस्तानी ‘इकरा’ने तीन सीमा पार करून भारत गाठले पण दुर्दैवाने…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Blind Love : 'प्रेम' माणसाकडून काहीही करवून घेऊ शकते. प्रेम आंधळे असते हे अनेक वेळा ऐकले आहे. मात्र, प्रेम आपली विचार करण्याची क्षमता देखील हिरावून घेते. हे पाकिस्तानी इकराच्या धाडस आणि मुर्खपणावरून लक्षात येते. पाकिस्तानी इकराने घरातून पळ काढून भारतीय प्रियकरासाठी तीन देशाच्या सीमा ओलांडून भारत गाठले. पण दुर्दैवाने…. वाचा संपूर्ण प्रकरण

एनडीटीव्हीने या संबंधीचे वृत्त दिले आहे. दिलेल्या माहितीनुसार, Blind Love : पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद शहारात राहणारी 16 वर्षीय इकराची ऑनलाइन लुडो गेम खेळताना एका भारतीय तरुणाशी ओळख झाली. तो गेम खरे तर ती हारली होती. पण ती त्यावेळी फक्त गेम नाही तर तिचे हृदय देखील हरवून बसली. त्या गेममध्ये खेळणा-या मुलाने स्वतःला मुस्लिम सॉफ्टवेअर इंजिनिअर समीर अंसारी सांगितले. त्यामुळे तो देखील मुसलमान आहे, असे समजून एक साधी सरळ लाजरी इकरा त्याच्या प्रेमात पडली.

Blind Love : प्रेमात पडलेल्या इकराने थेट भारत गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला भारताचा व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे तीने आपले दागिने विकून आणि मित्रांकडून पैसे उधार घेऊन थेट दुबई आणि दुबईवरून नेपाळच्या काठमांडूचे तिकीट काढले. एके दिवशी कॉलेज सुटल्यावर ती घरच्यांना न सांगता बेपत्ता झाली. त्यामुळे तिच्या घरचे तिचा शोध घेत होते. त्यांनी पाकिस्तानात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती. अशी माहिती तिचे काका अफजल जीवनी यांनी दिली.

इकडे पाकिस्तानात तिच्या बेपत्ता होण्याने चिंतेत होते. तर दुसरीकडे इकराच्या डोक्यावर प्रेमाचे भूत होते. ती दोन देशांच्या बॉर्डरवर पार करून भारतात आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्सुक होती. ती नेपाळला पोहोचल्याची माहिती तिने त्याच्या प्रियकराला दिली जिला ती समीर अंसारी समजत होती. या मुलाने तिला काठमांडूतून उत्तर प्रदेशच्या मार्गे भारत नेपाळ सीमेच्या मार्गातून बंगळुरूला आणण्याची व्यवस्था केली.

भारतात इकरा पोहोचली खरे मात्र, इकडे आल्यानंतर तिला समीरचे सत्य कळाले. हा समीर अंसारी सॉफ्टवेअर इंजिनिअर नसून एक सेक्युरिडी गार्डचे काम करतो. त्याचे खरे नाव मुलायम सिंह यादव असून तो हिंदू आहे. हे इकराला भारत गाठल्यानंतर कळाले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. पण आता तिला मागे जाण्याचा पर्याय नव्हता. मुलायम यादव याने लोकांना ती पाकिस्तानी मुसलमान आहे, हे समजू नये यासाठी तिचे हिंदू नाव रवा ठेवले. आणि इतरांनाही तेच सांगितले. इतकेच नाही त्याने तिच्या नावाचे आधारकार्ड देखील बनवून घेतले. आणि नंतर पासपोर्टसाठी देखील अप्लाय केला होता. Blind Love

मात्र, Blind Love ते ज्या घरात राहत होते तिथे इकरा ब-याच वेळा नमाज पडायची. त्यामुळे शेजा-यांना संशय आला हिंदूच्या घरात ती नमाज कशी काय पडते म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच इकराला ताब्यात घेतले. तिला सुधार गृहात ठेवून तिची चौकशी केली. आणि मुलायम सिंह यादव याला अटक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इकराने आपल्या घरी आईला व्हॉट्स अॅप कॉलद्वारे आपण अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर इकराच्या कुटुंबीयांनी एका वरिष्ठ पोलीस अधिका-याशी संपर्क साधून पाकिस्तानच्या विदेश कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी भारतीय समकक्षाशी संपर्क साधून इकराला शोधण्यासाठी मदत केली.

सध्या इकरा पाकिस्तानात पोहोचली असून घरी आल्यानंतर ती सातत्याने आपल्या कुटुंबीयांशी माफी मागत आहे. तिचे काका अफजल यांनी सांगितले ऑनलाइन गेम लुडो खेळा दरम्यान भारतीय व्यक्तीने स्वतःला मुसलमान सांगून त्यांच्या भाच्चीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र आम्ही भारत सरकार आणि पाकिस्तान सरकारचे आभारी आहोत त्यांनी आम्हाला आमची मुलगी परत मिळवून देण्यासाठी मदत केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT