Latest

Black rice : बहुगुणी काळ्या तांदळाच्या उत्पादनाला कोकणात गती; 250 ते 300 रुपये किलो मिळतोय भाव

दिनेश चोरगे

अलिबाग : कृषीप्रधान भारतात मोठ्या प्रमाणात तांदळाची शेती केली जाते आणि आहारात देखील मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले जाते. तांदूळ केवळ स्वादिष्टच नाही तर मानवी आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. सर्वसाधारणपणे तांदूळ पांढरा असतो. परंतु, आता काळ्या तांदळाच्या विविध गुणांमुळे कोकणातील शेतकर्‍यांचा या काळ्या तांदळाच्या लागवडीकडे गेल्या दोन वर्षांपासून कल वाढला आहे. काळ्या रंगाचा तांदूळ देशात सर्वत्र उपलब्ध आहे. तथापि, त्याचा वापर फारच कमी किंवा नगण्य होता. सुरुवातीला काळ्या तांदळाविषयी अनेक गैरसमज होते. परंतु, कृषी विभागाने गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतलेल्या काळ्या तांदळाच्या प्रोत्साहन योजनेमुळे कोकणात काळ्या तांदळाची लागवड सुमारे 2400 हेक्टरवर झाली असून उत्पादन आणि विक्री याला आता गती येत आहे.

यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो. फिलिपाईन्समध्ये व इंडोनेशियात याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या प्रकारच्या तांदळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. काळ्या तांदळात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मानवाला अनेक रोगांपासून दूर ठेवतात. पचायला सोपा असणारा या भातात कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता आहे, तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

  • कर्करोग टाळण्यासाठी क्षमता- काळा तांदूळ आरोग्यासाठी चांगला मानला जातो. काळ्या तांदळात दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात ज्यात कर्करोगापासून संरक्षण करण्याची क्षमता असते.
  •  मधुमेहावर फायदेशीर- मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळा तांदूळ चांगला मानला जातो. काळ्या तांदळात अँटिऑक्सिडंट, प्रोटीन आणि आयर्न असते, जे मधुमेह नियंत्रित करते. काळ्या तांदळात असलेले अँथोसायनिन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते.
  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- काळा तांदूळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. काळ्या तांदळात प्रथिने आणि फायबर भरपूर असते, जे वजन नियंत्रित ठेवते. अशा स्थितीत जर तुम्ही आहारावर असाल तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
  •  डोळ्यांसाठी फायदेशीर – काळा तांदूळ डोळ्यांसाठीही चांगला मानला जातो. यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळतात जे डोळे निरोगी ठेवतात. काळा भात नियमित खाल्ल्याने मोतिबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या गोष्टींचा धोका कमी होतो.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर- यामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.
  •  पचनसंस्था सुरळीत ठेवते- काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात, जे बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते- काळ्या तांदळात एंथोसायनिन नामक अँटिऑक्सीडंट भरपूर प्रमाणात आढळतात, जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोगापासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  •  अँटिऑक्सिडंट- हे तांदूळ गडद रंगाचे आहेत. अँटिऑक्सिडंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे मानवी त्वचा, मेंदू आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT