Latest

Bad Cholesterol : खराब कोलेस्टेरॉल हटवण्यासाठी काळी द्राक्षे गुणकारी

Arun Patil

नवी दिल्ली : हिरव्या द्राक्षांव्यतिरिक्त काळी द्राक्षे देखील खूप चवदार असतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास देखील हे उपयुक्त आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काळ्या द्राक्ष्यांच्या लाभांविषयीची ही माहिती…

1. काळी द्राक्षे अल्झायमरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले 'रेझवेराट्रोल' नावाचे तत्त्व अल्झायमरशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे, तसेच ते न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांवर देखील खूप फायदेशीर आहे.

2. काळी द्राक्षे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत. विशेषत: त्याचे सेवन त्वचेचा कर्करोग टाळण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.

3. जर तुम्ही वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काळ्या द्राक्षांचे सेवन केल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल तयार होण्यास प्रतिबंध करते आणि लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्यांपासून बचाव करते.

4. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी जास्त असल्यास काळ्या द्राक्षांचे सेवन फायदेशीर ठरेल. यामुळे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी कमी होते, ज्यामुळे किडनीवरील भार वाढत नाही आणि किडनीही निरोगी राहते.

5. काळ्या द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉईड व्यतिरिक्त, असे अनेक घटक आहेत जे हृदयरोगांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट हृदयविकाराचा झटका, रक्त गोठणे आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्यांशी लढण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतात. 6. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळ्या द्राक्षांचे सेवन करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् आणि आहारातील फायबर असतात, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.

SCROLL FOR NEXT