Latest

Pratap Patil Chikhlikar : भाजपची नांदेड लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकरांना

backup backup

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. राजकीय पक्षाकडून निवडणूकीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नांदेड लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांना जाहीर केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती ती आता दूर झाली आहे. दुसरीकडे बॅक फुटवर आलेल्या काँग्रेसकडून पक्षातील बलाढ्य उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यातच आता माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप तसे जाहीर करण्यात आले नाही.

नांदेड हा काँग्रेसचा गढ मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्याने काँग्रेसचा गढ ढासळला आहे. काँग्रेसचे अनेक जण अशोक चव्हाण यांना समर्थन देत भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे नांदेडची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी सोपी मानली जात आहे. दरम्यान, संभाव्य यादीत विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेस मधून भाजपात आलेल्या मीनल खतगावकर यांच्या नावाची चर्चा होत होती. तत्तपूर्वी भाजपकडून मीच उमेदवार असा दावा खासदार चिखलीकर यांच्याकडून वारंवार केला जात होता. असे असले तरी मीनल खतगावकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने मात्र उमेदवार कोण? या बाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता तो दूर झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यावेळचे काॅंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना ४० हजाराहून अधिक मताने पराभूत करून विजय मिळवला.

काॅंग्रेसकडून माजी आ. वसंत चव्हाण यांच्या नावाला पसंती

काॅंग्रेसकडून सुरुवातीला शेकापच्या प्रदेशाध्यक्षा तथा भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राहिलेले प्रा यशपाल भिंगे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यातच आता माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाला काँग्रेसकडून पसंती दिली जात आहे. लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वसंत चव्हाण यांची नायगाव, बिलोली मतदार संघात वर्चस्व आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT