Latest

दलित, आदिवासींचे आरक्षण संपविण्याचा भाजपचा प्रयत्न : राहुल गांधींचा आरोप

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपने खाजगीकरणाच्या धोरणात सरकारी नोकऱ्या संपवून दलित आदिवासी वर्गाचे आरक्षण हळूहळू हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला चढविला.

सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरक्षण संपविल्याचा आरोप केला आहे. सरकारी नोकरीच राहिली नाही तर आरक्षण आपोआपच बंद होईल, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच खाजगीकरणाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रात 2013 मध्ये 14 लाख स्थायी रोजगार होते. आता 2023 पर्यंत केवळ 8 लाख 40 हजार राहिले आहेत. केंद्रीय दूरसंचार लिमिटेड (बीएसएनएल), स्टील आयथॉरिटी ऑफ इंडिया (सेल), भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसह (भेल) इतर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून 6 लाख नोकऱ्या संपल्याचा दावा राहुल गांधी यांनी या पोस्टमधून केला आहे.

SCROLL FOR NEXT