Latest

लोकसभेसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक जाहीर: पीएम मोदींसह सीएम शिंदे, डीसीएम फडणवीस आणि पवार यांची यादीत नावे

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही नावाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार निश्चितीसह सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या तयार केल्या आहेत. भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यामध्ये एकूण ४० स्टार प्रचारक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रामधील मंत्री आणि नेत्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे स्टार प्रचारक

भाजपच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत महायुतीत आहेत. परंतु भाजपच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात भाजप नेते असा उल्लेख सर्व चाळीसही नेत्यांसाठी करण्यात आलेला आहे.

भाजपच्या ४० स्टार प्रचारकांमध्ये कोण?

भाजपच्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे पाटील, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजप नेते अशोक चव्हाण, विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्यातील मंत्री गिरीश महाजन, रविंद चव्हाण, तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी, रवी किशन, मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अतुल सावे, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक यांची नावे आहेत.

SCROLL FOR NEXT