Latest

Cryptocurrency Bitcoin : क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत तेजी, नेमके कारण काय?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cryptocurrency Bitcoin : क्रिप्टो मार्केट मे 2022 पासून त्याची सर्वोत्तम कामगिरी पाहत आहे. बाजार मूल्यानुसार सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने 41,000 डॉलरचा आकडा पार केला आहे. तसेच इथरियमनेही 2,200 डॉलरपर्यंत मजल मारली आहे. या तेजीमुळे क्रिप्टो मार्केट कॅप 1.54 ट्रिलियन डॉलरवर गेले. 2023 चा उच्चांक ठरला आहे. 2024 मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि बिटकॉइन ईटीएफला अंतिम मान्यता मिळाल्याने क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा तेजी पहायला मिळत आहे, असे अर्थ तज्ज्ञांचे मत आहे.

स्पॉट बिटकॉइन ईटीएफला यूएसमध्ये मान्यता मिळत असल्याचा खोटा अहवाल CoinTelegraph ने प्रकाशित केल्यानंतर बिटकॉइनमधील वाढीला सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला बिटकॉइनची किंमत सुमारे 28,175 डॉलर होती. सध्याची बिटकॉइनसाठी ही वाढ वर्षभरातील सर्वोच्च शिखर दर्शवते. या क्रिप्टोकरन्सीने वर्षाच्या सुरुवातीपासून 140% ची प्रभावी वाढ केल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (Cryptocurrency Bitcoin)

क्रिप्टो फर्म CoinDCX च्या रिसर्च टीमने म्हटलंय की, बिटकॉइन तेजीसह त्याची मार्केटमधील हिस्सेदारी वाढली आहे. ज्यामुळे अन्य क्रिप्टोकरन्सींच्या प्रदर्शनावर परिणाम झाला आहे. जर बिटकॉइनच्या किमतीत काही प्रमाणात स्थिरता आली आणि त्याची हिस्सेदारी कमी झाल्यास इतर क्रिप्टोकरन्सींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. CoinSwitch च्या मार्केट्स डेस्कने म्हटलंय की, 'लोकप्रिय मीम कॉइन Dogecoin ने 0.087 डॉलरची आपली प्रतिरोधक पातळी तोडली आहे। Tesla च्या सायबरट्रकचा उल्लेख केल्याने ही क्रिप्टोकरन्सी पुन्हा लोकप्रिय होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मात्र, ईटीएफला मंजुरी मिळण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असून नियामकाने ती पुन्हा नाकारल्यास त्याच्या किमतीतही घसरण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, ईथर, बीएनबी आणि एडीअ या क्रिप्टोकरन्सींच्या किमतीत 2-3 टक्के वाढ झाली आहे. तर एक्सआरपीने सपाट व्यवहार केला. बाजार मूल्यानुसार सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने दोन वर्षांपूर्वी 68,000 डॉलरपर्यंत मजल मारली होती. हा बिटकॉइनचा उच्चांक आहे. (Cryptocurrency Bitcoin)

SCROLL FOR NEXT