Latest

Bipasha Basu : बिपाशाचा मोठा खुलासा, मुलगी देवीची ओपन हार्ट सर्जरी…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री नेहा धूपियासोबत एका मुलाखतीत बिपाशा बसुने त्याची मुलगी व्हेंट्रिकुलर सेप्टिक डिसीज (व्हीएसडी) विषयी खुलासा केला. देवी केवळ तीन महिन्याची होती, तेव्हा ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. बिपाशा बसु (Bipasha Basu) आणि तिचा पती करण सिंह ग्रोवरने १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले. त्यावेळी या कपलला माहित नव्हतं की, तिचा जन्म व्हीएसडीसोबत झाला आहे. (Bipasha Basu)

बिपाशाचे मोठे दु:ख

मला माझ्या बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी समजलं की, तिच्या हृदयात दोन छिद्र आहेत." ती पुढे म्हणाली, "मी ठरवलं होतं की, मी ही गोष्ट कुणाशीही शेअर करणार नाही. पण आता मी ही गोष्ट सांगत आहे. कारण मला वाटतं की, खूप सर्वजणी आई आहेत, ज्यांनी माझ्या या प्रवासात मदत केली…"

सुरुवातीच्या पाच महिन्यांपासून दु:खी

व्हीएसडीच्याविषयी बोलताना ती म्हणाली, "आम्हाला सर्वांनाच हे माहिती नव्हतं की, व्हीएसडी काय आहे. हे एक व्हेंट्रिकुलर सेप्टल आहे… आम्ही एका मोठ्या वाईट टप्प्यातून गेलो. आम्ही आमच्या कुटुबीयांना याविषयी काही नाही सांगितलं. आम्ही दोघेही खूप चिंतेत होतो. आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं, पण आम्ही खूप दु:खी होतो." "सुरुवातीचे पाच महिने आमच्यासाठी खूप कठीण होते. पण, देवी पहिल्यादिवसापासून शानदार होती. आम्हाला सांगण्यात आलं की, वेळोवेळी स्कॅन करणं गरजेचं आहे, हे समजण्यासाठी की, ते छिद्र आपोआप ठिक होत आहे की नाही. परंतु, ज्याप्रकारे मोठे छिद्र होते. आम्हाला हे सांगण्यात आलं की, सर्जरी करावी लागणार. सर्जरी तेव्हा करणे सर्वात चांगले असते, जेव्हा बाळ तीन महिन्यांचं होईल."

देवीची झाली सर्जरी

बिपाशाने अश्रू ढाळत सांगितले की, "तुम्ही एका बाळाची ओपन हार्ट सर्जरी कशी करू शकता? हा विचार करून खूप दु:खी झाले. मी आणि करणने नैसर्गिकपणे ठीक होण्याची प्रतीक्षा केली. परंतु, पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात आम्हाला कोणताही परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आम्ही सर्जरी करण्याची मनाची तयारी केली. यशस्वी सर्जरी झाली आणि देवी आता ठिक आहे." नंतर बिपाशा पुन्हा हासली आणि म्हमाली की, देवी खूप साहसी आहे. अशा स्थितीतही ती हसत खेळत राहिली.

SCROLL FOR NEXT