Latest

Bipasha Basu Baby Shower : बिपाशा बेबी शॉवर पार्टीत म्हणाली, मला दोन मुलं…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर लवकरच आई-वडील होणार आहेत. बिपाशा तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी बिपाशाच्या आईच्या घरी ओठी भरणीचा कार्यक्रम (बेबी शॉवर) पार पडला होता. यानंतर दुसऱ्यांदा तिने बेबी शॉवर (Bipasha Basu Baby Shower) सोहळ्यानिमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत बिपाशा आणि करणसोबत काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावलीय. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी बिपाशाचा तिच्या आईच्या घरी बेबी शॉवर (Bipasha Basu Baby Shower) सोहळा पार पडला होता. यावेळी बिपाशाचे औक्षण आणि ती पंचपक्कावानाचे जेवण करताना दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा बिपाशाने नुकतेच एका खास पार्टीचे नियोजन करत खूपच मौजमस्ती केली आहे. यावेळी बिपाशा सिंपल गुलाबी गाऊनमध्ये तर करण ब्ल्यू रंगाच्या सूटमध्ये एकदम हॅडसम दिसला. यावेळी काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. यात खास करून बॉलिवूड अभिनेत्री आरती सिंहदेखील एन्जॉय करताना दिसली. यावेळी बिपाशाने गुलाबी गाऊनसोबत मिनिमल मेकअप आणि एण्डेड ईयररिंग्सने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या पार्टीत दोघे कपल येताच बिपाशा खूपच एक्साइटेड दिसली. बिपाशा आणि करणने सहभागी उपस्थितांसह मिडीयासमोर दोन वेगवेगळे केस कापला. पालक होण्याचा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडूंन वाहत होता. यावेळी बिपाशा म्हणाली की, 'करण लवकरच बाबा होणार आहेत. परंतु, मी अजून बेबीच आहे. मी आता दोन मुलांची आई होणार आहे, एक हा आणि दुसरा लवकरच येणार आहे.' बिपाशाचे हे ऐकून करण लाजतो. याआदी बिपाशाने एक पोटोशूट करून तिच्या प्रेग्नेसींची गुडन्यूज दिली होती. हा फोटोशूट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.

हेही वाचलंत का? 

( video : viralbhayani instagram वरून साभार )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT