Latest

Drunk driving : दारू प्याली तर तुमची दुचाकी सुरू होणार नाही!

Arun Patil

रांची : ड्रिंक अँड ड्राइव्हची अनेक प्रकरणे सातत्याने आपल्यापुढे येतात. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, आता असे अपघात टाळण्यासाठी रांची येथील सेंट झेव्हियर स्कूलच्या चौघा विद्यार्थ्यांनी खास प्रकारचे हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेटमध्ये सेन्सरयुक्त चिप बसवण्यात आली आहे. ( Drunk driving )  त्यामुळे दारू पिऊन तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. बाईकचा रायडर नशेत असेल तर ही चिप अलर्ट पाठवेल.

Drunk driving : कसे काम करेल हेल्मेट?

हेल्मेटने पाठवलेल्या अलर्टमुळे बाईक सुरूच होणार नाही. पुढे जाऊन आणखी एक नवीन चिप तयार करण्याचा विद्यार्थ्यांचा विचार आहे. त्यामुळे हेल्मेट नसल्यास अथवा व्यवस्थित न घातल्यास बाईक सुरू होणार नाही. हेल्मेटमधील चिप दारूचा वास डिटेक्ट करेल व यामुळे बाईक सुरू होणार नाही. आता विनाहेल्मेट बाईक सुरू होणार नाही अशा पद्धतीची चिप तयार करण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे. अविराज सिंह, वत्सल सरावगी, पार्थ आणि आरव पोद्दार अशी या किमयागार विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना दिली. बाकी सगळे काम या मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे पार पाडले.

रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. यामागील मुख्य कारणे म्हणजे हेल्मेट न घालणे आणि मद्यपान करून बाईक सैराट सोडणे. आता अशा प्रकारच्या घटनांना या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनोख्या हेल्मेटमुळे चाप बसेल, अशी आशा आपण बाळगू शकतो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT