Latest

Bike taxi ban in Delhi : दिल्लीत बाईक टॅक्सीवर बंदी! ओला-उबेर, रॅपिडोला मोठा धक्का

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Bike taxi ban in Delhi : राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत बाईक टॅक्सी वरील बंदी कायम राहणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली.उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारने यासंदर्भात जारी केलेल्या नोटीस वर स्थगिती दिली होती.राज्य सरकार ने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते.व्यापक धोरण निर्मिती पूर्वी रँपिडो तसेच उबर सारख्या अँप आधारित सेवांमध्ये गैर व्यावसायिक नोंदणीकृत दुचाकी वाहनांचा वापर केला जाऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे.

यापूर्वी २६ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने

रँपिडो च्या याचिकेवर दिल्ली सरकारला नोटीस बजावले होते.रँपिडो ने राज्य सरकारच्या कायद्याला आव्हान दिले होते. या कायद्यानुसार दुचाकी वाहनांना परिवहन वाहन म्हणून नोंदणी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.उच्च न्यायालयाने यासंदर्भात सरकारला एक अंतिम धोरण निश्चित करेपर्यंत बाईक-टॅक्सी एग्रीगेटर विरोधात कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

SCROLL FOR NEXT