Latest

LSG vs GT : गुजरातचा लखनौवर मोठा विजय

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाची दमदार खेळी आणि मोहित शर्माच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सनने लखनौ सुपर जायंट्सवर ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. लखनौचा कर्णधार कुणाल पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातने धावांचा डोंगर उभा केला.

 शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर २२७ धावा केल्या आणि लखनौ समोर २२८ धावांचे आव्हान ठेवले. गुजरातच्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला १७१ धावाच करता आल्या. लखनौकडून कायल मेयर्सने ३२ चेंडूमध्ये ४८ धावा आणि क्विंटन डि कॉकने ४१ चेंडूमध्ये ७१ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने ४ तर नूर अहमद आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, गुजरातकडून वृद्धीमान साहा ४३ चेंडूमध्ये ८१ धावा, शुभमन गिल ५१ चेंडूमध्ये ९४ धावा, हार्दिक पंड्या १५ चेंडूमध्ये २५ धावा आणि डेव्हिड मिलरने १२ चेंडूमध्ये २१ धावांचे योगदान दिले. गुजरातच्या फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

लखनौचा संघ – क्विंटन डिकॉक, कायल मेयर्स, दीपक हुड्डा, करन शर्मा, कुणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, स्वप्निल सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान

गुजरातचा संघ – वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT