Latest

WTC Final Points Table: टीम इंडियासमोर मोठे संकट, WTC चे समीकरण बदलणार

रणजित गायकवाड

इंदूर, पुढारी वृत्तसेवा : WTC Final Points Table : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून 30 विकेटस् पडल्या आहेत. तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 76 धावांचे टार्गेट मिळाले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी आहे. या सामन्याच्या निकालाचा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीवर मोठा परिणाम होणार आहे.

भारत हरल्यास…

इंदूर कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत प्रवेश करेल. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची अंतिम फेरी गाठण्याची प्रतीक्षा थोडी वाढू शकते. इंदूर कसोटीत पराभव झाल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी सामना कोणत्याही किमतीवर जिंकावा लागेल. (WTC Final Points Table)

मालिका बरोबरीत राहिल्यास…

भारतीय संघाची या कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरी झाली तर न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एक तरी हरवावी अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तेही मायदेशात जिंकणे श्रीलंकेसाठी खूप कठीण असणार आहे.

ऑस्ट्रेलिया जिंकल्यास…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचे समीकरण स्पष्ट आहे. इंदूर कसोटीत विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीत जातील. म्हणजेच ऑस्ट्रेलिया 3-0 किंवा 3-1 ने मालिका गमावला तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. (WTC Final Points Table)

दोन्ही सामने हरल्यास…

जर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले, तर अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावी लागेल, त्यात अपयशी ठरल्यास भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT