Latest

नांदेड : नायगावात ‘भारत जोडो यात्रे’चे माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्याकडून स्वागत

अविनाश सुतार

नायगावबाजार; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मार्गस्थ आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ही यात्रा नरसीहून नायगाव शहरात दाखल झाली. यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी या यात्रेचे महाराष्ट्रातील देगलूर येथे आगमन झाले. मंगळवारी देगलूरहून शंकरनगरपर्यंत ही यात्रा आली. बोचऱ्या थंडीत राहुल गांधी यांनी पहाटे सहा वाजता शंकरनगर येथून पायी चालणे सुरू केले. किनाळा हिप्परगा, नरसी येथून आज सकाळी साडे आठ वाजता नायगाव येथे यात्रा दाखल झाली.

यावेळी चिमुकल्या मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. अमर राजुरकर, गोविंदराव नागेलीकर, श्रावण रॅपनवाड, माजी सभापती संजय अप्पा बेळगे, प्रा. रविंद्र पा. चव्हाण, विजय पा. चव्हाण, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. आजुबाजुच्या खेड्यापाड्यातील आलेले शेकडो नागरिक नरसी चौकातून नायगावपर्यत राहुल गांधी यांच्यासोबत उत्स्फूर्तपणे चालत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT