Latest

किशोर आवारे खून प्रकरण : वडिलांना कानशिलात लगावली म्हणून…

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  किशोर आवारे खून प्रकरणात पोलिसांनी गौरव खळदे याला अटक केली आहे. आवारे यांनी गौरव याच्या वडिलांच्या कानशिलात लगावली होती. त्या रागातून त्याने सुपारी देऊन हे कांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शाम अरुण निगडकर (४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), आदेश विठ्ठल धोत्रे (२८, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (३२, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव याचे वडील माजी नगरसेवक भानू खळदे आणि किशोर आवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली, असल्याची माहिती समोर येत आहे.

SCROLL FOR NEXT