Latest

सावधान, भारतातील ६० लाख जणांचा व्हॉट्सॲप डेटा चोरीला!

मोहन कारंडे

लंडन : वृत्तसंस्था : जगभरातील ५० कोटी जणांचा व्हॉट्सॲप डेटा हॅकर्सनी चोरल्याचे समोर आले असून, या प्रकारामुळे इतक्या साऱ्या वापरकर्त्यांची माहिती व चॅटस्चा तपशील हॅकर्सच्या हाती लागला आहे. हॅकर्सनी चक्क हा डेटा विक्रीला काढला असून, त्यात भारतातील ६० लाख जणांचा समावेश असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या डेटाचा गैरवापर करून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने वापरकर्त्यांना सावध करत खबरदारीचे उपाय योजण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जवळपास प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन आणि प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉटस्ॲप, अशी आजची जगभराची स्थिती आहे. मोफत संवादासाठीचे उत्तम साधन असल्याने बहुतेक सारे फोनधारक या अॅपचा वापर करत असतात. कोट्यवधी वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे, तो चुकीच्या लोकांच्या हाती लागू नये, याची खबरदारी कंपनी घेत असते. चॅटसही एन्क्रीप्टेड असतात. तरीही ही यंत्रणा भेदून हॅकर्सनी ही डेटा चोरी केल्याचे समोर आले आहे.

यावेळी व्हॉट्सॲप हॅक न करता स्क्रॅपिंग पद्धतीने हॅकर्सनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या वेबसाईट्सवरू  हे नंबर घेण्यात आल्याने एकाच जागी हॅकिंग झाल्याचे दिसत नाही. हॅकर्सनी ५० कोटी जणांचा हा डेटा चक्क विक्रीसाठी ठेवला असून, फसवणूक व गैरप्रकार करणाऱ्यांसाठी ही सोन्याची खाण मानली जात आहे. ते या डेटासाठी कोट्यवधी रुपये मोजायला तयार असतात. या ५० कोटी क्रमांकांपैकी ४ कोटी ८७ लाख क्रमांक पूर्णपणे सक्रिय असल्याचे हॅकर्सचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT