Latest

Ben Stokes Surgery : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बेन स्टोक्सवर यशस्वी शस्त्रक्रिया

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्वतः स्टोक्सने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा अष्टपैलू खेळाडू आता पुनर्वसन सेंटरमध्ये राहणार आहे. (Ben Stokes Surgery)

स्टोक्सला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी 5 ते 7 आठवडे लागू शकतात. यामुळे तो भारताविरुद्ध जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये होणार आहे. (Ben Stokes Surgery)

बेन स्टोक्स गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीमुळे तो मैदानावर तो आपली सर्वोत्तम कामगिरी बजावू शकला नाही. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतो असे बोलले जात होते. परंतु, त्याला तंदुरुस्त होण्यासाठी 5ते7 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT