Latest

पोळ्यांची डागडुजी करण्यातही कुशल असतात मधमाश्या

Arun Patil

वॉशिंग्टन : एका संशोधनातून असे समोर आले आहे की मधमाश्यांमध्ये अतिशय खराब हवामान आणि धक्क्यांनंतरही आपली पोळी बांधण्यात, त्यांची डागडुजी करण्यात आणि आपली वसाहत अन्यत्र हलवण्यातही कुशल असतात. अमेरिकेच्या ऑबर्न युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मधमाश्यांच्या पोळे बनवण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. त्यांना आढळले की मधमाश्या 'थ्री-डी नेस्ट' बनवतात. त्या अंडाकार ब्लॉक बनवतात, त्यापासून संपूर्ण पोळ्याची निर्मिती होते. हे ब्लॉक पोळ्यात सर्व दिशांना फैलावलेले असतात.

पोळ्याची ही रचना किती महत्त्वाची आहे हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी एक पोळे मोडले. मात्र, मधमाश्या त्यामुळे खचून गेल्या नाहीत. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन लवकरच नवे पोळे बनवले. त्याचे ब्लॉक, वजन, तापमान वगैरे सर्व काही अगदी जुन्या पोळ्यासारखेच होते. संशोधकांनी वारंवार मधमाश्यांची अनेक पोळी मोडली, मात्र दरवेळी मधमाश्यांनी कमी वेळेत नवी पोळी तयार केली. जुन्या व नव्या पोळ्यांमध्ये कोणताही फरक दिसून आला नाही.

संशोधकांनी याबाबत 'टेट्रागोन्युला' मधमाश्यांचे उदाहरण दिले. या मधमाश्यांचे पोळे थ्री-डी प्रतिमेसारखे दिसते. ही मधमाशी गणितीय ब्लूप्रिंटचे अनुसरण करते. हा एक विशेष प्रकारचा पॅटर्न असतो जो आकारात गोल असतो. पोळे बनत बनत एक घुमावदार आकार घेते. याबाबतचे संशोधन ब्रिटनच्या केम्ब्रिज आणि स्पेनच्या ग्रेनाडा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मिळून केले आहे.

या मधमाश्या असे पोळे तयार करतात जे दिसण्यात अनेक मजल्यांच्या कार पार्किंगसारखे असते. हे पोळे तयार करीत असताना त्या खास प्रकारच्या गणितीय सूत्रांचा वापर करतात. हे शिक्षण त्यांना निसर्गतःच मिळालेले असते हे विशेष! त्या चार प्रकारच्या आकारात आपले पोळे तयार करू शकतात. पहिले घुमावदार, दुसरा बुल्स-आय आकाराचा आणि तिसरा डबल स्पायरल म्हणजेच दुहेरी घुमावदार असतो. चौथा आकार डोंगरउतारावरील पायर्‍यांच्या शेतीसारखा असतो.

SCROLL FOR NEXT