Latest

बालदिनाला बच्चे कंपनीसाठी येतोय ‘बर्फाची राणी’ चित्रपट!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपन शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट 'बर्फाची राणी' अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.

चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादुगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT