Latest

Barbie Movie : ‘बार्बी’ने इतिहास घडवला; बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओपेनहायमरसोबत आणखी एक हॉलीवूड चित्रपट 'बार्बी' रिलीज झाला आहे. (Barbie Movie) हा चित्रपट ग्रेटा गेरविगच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. 'बार्बी'ने परदेशात चांगला बिझनेस केला आहे. भारतात रिलीजच्या १३ दिवसांत बार्बीने केवळ ५० कोटींच्या जवळपास कमाई केली होती. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने २ ऑगस्ट रोजी भारतात ७० लाखांचा बिझनेस केला आहे. तर लाईफ टाईम कलेक्शन ३७.५५ कोटींचे होते. आता बार्बीने इतिहास घडवला आहे. १ अब्ज डॉलरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत चित्रपटाने शानदार कमाई केलीय. (Barbie Movie)

रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात, जगातील सर्वात प्रसिद्ध बाहुलीबद्दलचा चित्रपट जागतिक स्तरावर अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा या वर्षीचा दुसरा चित्रपट ठरला. वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (आतापर्यंत), The Super Mario Bros. Movie ठरला होता.

बॉक्स ऑफिसवर बार्बी पहिल्या क्रमांकावर असली तरी जागतिक पातळीवर मेग २: द ट्रेंच (Meg 2: The Trench) ने ११२ मिलियन डॉलर कमावून पहिले स्थान मिळवले आहे.

बार्बीवर काही इस्लामिक देशात बंदी 

'बार्बी' अनेक इस्लामिक देशांमध्ये वादग्रस्त ठरला आहे. कतार आणि कुवैत यासारख्या काही देशांमध्ये पूर्णपणे बंदी आहे. संयुक्त अरब अमीरातमध्ये आधीच रीलीज झाली होती. बुर्ज खलीफावर देखील दाखवण्यात आलं होतं. सऊदी अरबला काही खास समस्या नव्हती. परंतु, पितृसत्ताक आणि एलजीबीटीक्‍यू थीमवरून वैश्विक स्‍तरावर प्रेक्षकांची वाढती टीकासोबत देशात चित्रपट रिलीजची तारीख ३१ ऑगस्‍टवर पुनर्विचार करावा लागला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटांना तोपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, जोपर्यंत सऊदी अरबच्या सेन्सॉर बोर्डाची पूर्ण सहमती होत नाही. 'बार्बी'वर प्रतिबंध करणाऱ्या काही दोशांमध्ये बहरीन, ईराण, व्हिएतनाम, फिलीपिन्स आणि रशियाचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT