Latest

Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्च महिन्यात रविवार आणि शनिवार सुट्ट्यांच्या दिवसासोबत सणाचे दिवस असे एकूण १२ दिवस बॅंका बंद राहणार (Bank Holidays in March 2023) आहेत. यादरम्यान बँकेचे सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने त्याचा ग्राहकांना फटका बसणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, मार्च महिन्यात सर्व बँका दर आठवड्यात रविवारी म्हणजे, ५, १२, १९ आणि २६ मार्च तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी म्हणजेच ११ आणि २५ मार्च रोजी असे एकूण ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. याशिवाय सणाच्या मुहुर्तावरदेखील काही बँका बंद राहणार आहेत.

३ मार्च (चापचर कूटच्या निमित्ताने), ६ मार्च ( होळी), ७ मार्च (धुलिवंदन), ९ मार्च ( संत तुकाराम बीज ), २२ मार्च (गुढी पाडवा, नववर्ष दिवस), ३० मार्च (श्रीराम नवमी) रोजीदेखील ६ दिवस बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत. एकूणच मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. एकिकडे कर्मचाऱ्यांना सुट्यांचा आनंद मिळणार आहे तर दुसरीकडे सुट्ट्यांचा बँक ग्राहकांना फटका बसणार आहे. यामुळे ग्राहकांना सुट्ट्यांचा दिवस वगळून बँकेची कामे त्वरीत करून घ्यावी लागणार आहेत. (Bank Holidays in March 2023)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT