कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुड फ्रायडेनिमित्त राष्ट्रीयीकृत, नागरी व जिल्हा बँकांचे कामकाज आज, शुक्रवारी बंद राहणार आहे, तर शनिवार (दि. 30) व रविवारी (दि. 31) बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे.
आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जावेत, यासाठी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. शनिवारी ग्राहकांना बँकांच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शनिवारी एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहार रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर सरकारी धनादेश क्लीअर करण्यासाठीही रविवारी बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. सर्व बँका नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील. जिल्हा व नागरी बँकाही शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय धनादेश तत्काळ वटवण्याची प्रक्रिया राबवावी, असे आदेशात म्हटले आहे.