Latest

चीनमध्ये छापतात अनेक देशांच्या नोटा!

Arun Patil

बीजिंग : बहुतांश देश आपल्या देशातील चलनी नोटा स्वतःच्याच देशात छापत असतात, पण काही देश वेगवेगळ्या कारणांमुळे इतर ठिकाणीही छापून घेतात. त्याबाबत चीनमधील एक कंपनी अतिशय प्रसिद्ध आहे. खरे तर 'बनावटगिरी' या शब्दाला 'चिनी माल' हा पर्यायी शब्दच बनला आहे. अशा स्थितीत चीनमध्ये नोटा छापून घेण्याचे धाडस करणारे अफलातूनच म्हणावे लागतील! विशेष म्हणजे नोटा छापणारी ही चिनी कंपनी सरकारीच आहे.

नोटा छापण्यासाठी लागणारा कागद, शाई ही कंपनी स्वतःच बनवते. त्यांचा प्रिंटिंग सेटअप चीनच्या अनेक शहरांमध्ये आहे. या कंपनीचे नाव 'चायना बँकनोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन' म्हणजे 'सीबीपीए' असे आहे. या कंपनीकडे नोटा छापण्यासाठी आणि त्यासंबंधी वस्तू तयार करण्यासाठी दहा मोठे कारखाने आहेत. यामध्ये सुमारे 18 हजार लोक काम करतात. चीनचा दावा आहे की ही जगातील सर्वात सुरक्षित नोट छापणारी कंपनी आहे! इथे विना परवानगी एकही नोट बाहेर जात नाही. असे मानले जाते की चीनचा हा सेटअप ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत खूप मोठा आहे.

यूएस ब्युरो ऑफ एनग्रेविंग अँड प्रिंटिंगमध्ये दोन हजारपेक्षा कमी कर्मचारी काम करतात, तर ब्रिटनच्या डी ला रु मध्ये तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत.

SCROLL FOR NEXT