Latest

AFG vs BAN : अफगाणिस्तानवर बांगलादेशचा सहज विजय

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क :   सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ 37.2 षटकात 156 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 34.4 षटकांत 4 गडी गमावत 158 धावा करून सामना जिंकला. सामन्यात अर्धशतक झळकावण्याबरोबरच तीन विकेट घेणाऱ्या मेहदी हसनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. (BAN vs AFG)

शांतो आणि मेहदीने मिळवला विजय

बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याने 83 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. मेहदी हसन मिराजने 73 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने पाच चौकार मारले. शाकिब अल हसन 14 तर लिटन दास 13 धावा करून बाद झाला. तनजीद हसनने पाच धावा केल्या. मुशफिकुर रहीम दोन धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी, अजमतुल्ला उमरझाई आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (BAN vs AFG)

साकिब आणि मेहदीची घातक गोलंदाजी

त्याआधी अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक 47 धावा केल्या. इब्राहिम झद्रान आणि अजमतुल्ला ओमराई यांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने प्रत्येकी 18 धावांचे योगदान दिले.

राशिद खानला नऊ, मोहम्मद नबीला सहा आणि नजीबुल्ला जद्रानला पाच धावा करता आल्या. मुजीब उर रहमानने एक धाव घेतली. नवीन उल हक खातेही उघडू शकला नाही. फजलहक फारुकी खाते न उघडता नाबाद राहिला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शरीफुल इस्लामला दोन विकेट घेतल्या. मुस्तफिजुर रहमान आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

न्यूझीलंड गुणतालिकेत पहिल्या स्थानी

बांगलादेशने अफगाणिस्तानला सहा गडी राखून पराभूत करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यातील विजयामुळे बांगलादेशने दोन गुण कमावले आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत न्यूझीलंड आणि पाकिस्ताननंतर अनुक्रमे एक आणि दोन नंबरवर आहेत. तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. उत्तम नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT