Latest

BAN vs AFG : बांगलादेशचे अफगाणिस्तानला ३३५ धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

लाहोर; वृत्तसंस्था : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगला देशने अफगाणिस्तानविरुद्ध 5 बाद 334 अशी भक्कम धावसंख्या उभारली. मेहिदी हसन मिराझ (112) आणि नजमूल होसैन शांतो (104) यांनी शतके झळकावली.

लाहोर येथील सामन्यात बांगला देशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगला देशचा संघ 'करो वा मरो' अवस्थेत आहे. 'ब' गटातील दुसर्‍या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध रविवारी त्यांनी सर्वस्व पणाला लावले अन् जबरदस्त खेळ करून दाखवला. सलामीवीर मेहिदी हसन मिराझ आणि नजमूल होसैन शांतो यांनी वैयक्तिक शतक झळकावून बांगला देशसाठी धावांचा डोंगर उभा केला. 43 व्या षटकात मिराझने हाताला दुखापत झाल्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद नईम व मिराझ सलामीला आले आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. मुजीब उर रहमानने ही जोडी तोडली अन् नईम 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. तोवहिद हृदय भोपळ्यावर गुलबदीन नईबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या सामन्यात 89 धावांची खेळी करणार्‍या नजमूलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नजमूल व मिराझ यांनी तिसर्‍या विकेटसाठी 194 धावांची विक्रमी भागीदारी केली. मिराझ हाताच्या दुखापतीमुळे 119 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 112 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मजमूल 45 व्या षटकात दुर्दैवीरीत्या रन आऊट झाला. त्याने 105 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 104 धावा केल्या.

मुश्फिकर रहिमही 15 चेंडूंत 25 धावांवर रन आऊट झाला. शाकिब अल हसन व शमीम होसैन यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. शमीम 11 धावांवर रन आऊट झाला. बांगला देशने 50 षटकांत 5 बाद 334 धावांचा डोंगर उभा केला. शाकिबने 18 चेंडूंत नाबाद 32 धावा चोपल्या.

(BAN vs AFG)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT