Latest

बल्लारपूरकरांनी अनुभवली लोककलावंतांची मांदियाळी! १९४६ लोककलावंतांचा सहभाग

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला चंद्रपुर राममय झाले. महाराष्ट्रातून दाखल झालेल्या जवळपास दोन हजार लोककलावंतांच्या सहभागाने श्रीरामचंद्रांना पारंपरिक कलांमधून अभिवादन करण्यात आले. राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लोककलांना राजाश्रय मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोककलावंत तर उत्साहाने सहभागी झालेच. शिवाय दक्षिणेतील लोककलावंतही भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. अगदी ढोलताशा पथक आणि भजन मंडळींसह आदिवासी तूर नृत्य, तारपा नृत्य, धनगरी तोफ, दशावतार, कोकणातील पालखी, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, दक्षिणेतील बाहुल्या, चंद्रपुरातील गुसाडी पारंपरिक नृत्य, सोंगी मुखवटे यासह झाडीपट्टीतील लोककलांचे सादरीकरण यावेळी झाले. याशिवाय दाणपट्टा, तलवार, मल्लखांब या पारंपरिक युद्धकला व खेळांचेही सादरीकरण करण्यात आले.

लोककलांना राजाश्रय

काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंतांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन सुधीर मुनगंटीवार यांनी लोककलावंतांना मोठा दिलासा दिला होता. या निर्णयानंतर तमाशा कलावंतांनी साश्रू नयनांनी आभार मानले होते. चंद्रपुरातील लोककलावंतांचा भव्य मेळा बघताना त्याची पुन्हा एकदा सर्वांना आठवण झाली.

SCROLL FOR NEXT